सिडको : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाळकुटेश्वर पुलाजवळील अमरधाम परिसरात भंडार्याचे भांडे का धुतले नाही, असे किरकोळ कारण काढून एका 26 वर्षीय मजुरावर चार जणांनी एकत्र येत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये एका आरोपीने धारदार हत्याराने कपाळ व गालावर वार करत जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनेतील फिर्यादी कृष्णा विजय पवार (वय 26, रा. मीरा दातार दर्ग्यासमोर, शिवाजी चौक, जुने नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदार कृष्णा पवार आणि त्याचा मित्र वरुण भागवत हे दोघे टाळकुटेश्वर मंदिरालगत असलेल्या पुलाच्या खाली पायर्या उतरून बसले असताना, त्यांच्याच ओळखीचे अनिकेत आमले, आदित्य आमले, अभिजित आमले आणि श्रवण गावित हे तेथे आले. भंडार्याच्या कार्यक्रमाचे भांडे का घासले नाही? या कारणावरून त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी श्रवण गावितने हातातील धारदार वस्तूने कृष्णा पवारच्या कपाळावर व गालावर वार करत जखमी केले. गंभीर जखमी झाल्याने त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे व एस. एस. बाविस्कर करीत आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…