सरपंच, ग्रामसेविकेसह खासगी व्यक्तीला
पन्नास हजारांची लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या निवृत्त शिपायाचे राहणीमान भत्ता बिलाच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका, सरपंच आणि अन्य एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
बलायदुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशा देवराम गोडसे, सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे, मल्हारी पंढरीनाथ गटकळ या तिघां लाचखोरांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदार हे ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होेते. जून 2020 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांचे बलायदुरी ग्रामपंचायतीत एक लाख 64 हजार 682 रुपये राहणीमान भत्ता बाकी होता. या रकमेचा धनादेश काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लावण्यात आलेल्या सापळ्यात तिघे अडकले. पोलीस निरीक्षक संदीप घुगे हवालदार एकनाथ बाविस्कर,राजेंद्र जाधव, शरद हेबांडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, नरेंद्र पवार, उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.