नांदगाव येथील शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचे भाकीत
नांदगांव : प्रतिनिधी
मंत्रिमंडळाचा विस्तार होणे आधीच हे गद्दारांच सरकार कोसळेल असं वक्तव्य आदित्य ठाकरे केले आहे नांदगाव येथे आयोजित केलेल्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते नांदगाव दौऱ्यावरआले होते जैन धर्म शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गणेश धात्रक नरेंद्र दराडे, अल्ताफ खान,संतोष गुप्ता कुणाल दराडे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख अद्वय हिरे शशिकांत मोरे अशोक जाधव आधी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी गणेश धात्रक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माझ्याकडे खोके नाहीत मात्र सर्व काही ओके आहे असा खोसक खोसतोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला तर अंबादास दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 24000 शेतकरी 2020 च्या पिक विमा पासून वंचित असून पिक विमा मिळून देण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे वेळ आली तरी करणार असल्याचं सांगत पुढील येणाऱ्या काळात कांदे बाहेर फेकले जातील असा टोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला
येत्या दोन ते तीन महिन्यात गद्दारांच सरकार कोसळणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी केलं ते सरकार घटनाबाह्य आहे स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्ली वारी करतात उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर गद्दारांनी वार केले त्या गद्दारांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आम्ही शून्यावर गेलो तरी शंभर आमदार निवडून आणून दाखवू असे सांगत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे हेच कळत नाही पाच ते सहा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्र राज्यातील तरुणांचा विचार करायला सरकार तयार नाही
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही इतर ठिकाणी उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मात्र आता काही व्यक्ती आयत्या पिठावर रेगा ओढताना दिसून येत आहेत मला आपले आशीर्वाद हवे आहेत ते आपण द्यालच अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली,