उत्तर महाराष्ट्र

सरपंच, ग्रामसेविकेसह खासगी व्यक्तीला पन्नास हजारांची लाच घेताना अटक

सरपंच, ग्रामसेविकेसह खासगी व्यक्तीला
पन्नास हजारांची लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या निवृत्त शिपायाचे राहणीमान भत्ता बिलाच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका, सरपंच आणि अन्य एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
बलायदुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशा देवराम गोडसे,  सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे, मल्हारी पंढरीनाथ  गटकळ या तिघां लाचखोरांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदार हे ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होेते. जून 2020 मध्ये ते निवृत्त झाले.  त्यांचे बलायदुरी ग्रामपंचायतीत एक लाख 64 हजार 682 रुपये राहणीमान भत्ता बाकी होता. या रकमेचा धनादेश काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लावण्यात आलेल्या सापळ्यात तिघे अडकले.  पोलीस निरीक्षक संदीप घुगे हवालदार एकनाथ बाविस्कर,राजेंद्र जाधव, शरद हेबांडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,  अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे,  नरेंद्र पवार, उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.
Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago