नाशिक

मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच गद्दारांच सरकार कोसळेल

नांदगाव येथील शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचे भाकीत
नांदगांव : प्रतिनिधी
        मंत्रिमंडळाचा विस्तार होणे आधीच हे गद्दारांच सरकार कोसळेल  असं वक्तव्य आदित्य ठाकरे केले आहे  नांदगाव येथे आयोजित केलेल्या  शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते नांदगाव दौऱ्यावरआले होते जैन धर्म शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
       यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  गणेश धात्रक नरेंद्र दराडे, अल्ताफ खान,संतोष गुप्ता कुणाल दराडे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख अद्वय हिरे शशिकांत मोरे अशोक जाधव आधी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी गणेश धात्रक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माझ्याकडे खोके नाहीत मात्र सर्व काही ओके आहे असा खोसक खोसतोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला तर अंबादास दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 24000 शेतकरी 2020 च्या पिक विमा पासून वंचित असून पिक विमा मिळून देण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे वेळ आली तरी करणार असल्याचं सांगत पुढील येणाऱ्या काळात कांदे बाहेर फेकले जातील असा टोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला
   येत्या दोन ते तीन महिन्यात गद्दारांच सरकार कोसळणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी केलं ते सरकार घटनाबाह्य आहे स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्ली वारी करतात उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर गद्दारांनी वार केले त्या गद्दारांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आम्ही शून्यावर गेलो तरी शंभर आमदार निवडून आणून दाखवू असे सांगत  महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे हेच कळत नाही पाच ते सहा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्र राज्यातील तरुणांचा विचार करायला सरकार तयार नाही
        महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही इतर ठिकाणी उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मात्र आता काही व्यक्ती आयत्या पिठावर रेगा ओढताना दिसून येत आहेत मला आपले आशीर्वाद हवे आहेत ते आपण द्यालच अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली,
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

14 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

14 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

15 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

15 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

15 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

15 hours ago