लाखलगावला आढळले तीन बछडे

 

नाशिक : प्रतिनिधी
लाखलगाव येथे दोन दिवसांपूर्वी एका उसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तीन बछडे मिळून आले होते. भयभीत झालेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसतोड थांबवत याबाबतची माहिती वनविभागाला दिली. दरम्यान नाशिक पश्‍चिम वनवृत्तातील वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
यानंतर या बछड्यांची व त्यांच्या आईच्या भेटीसाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील लाखलगाव येथे 15 दिवसांच्या बछड्यांना आईच्या कुशीत विसावण्यासाठी सध्या वनविभाग आणि ईकोएको या संस्थेकडून प्रयत्न करत आहे. घटनास्थळी कॅमेरे लावून नजर ठेवण्यात येत आहे. कमी दिवसांचे असल्यामुळे या बछड्यांची आई येऊन त्यांना घेऊन जाईल, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस आता बछड्यांच्या भेटीसाठी ही टीम कार्यरत आहे. त्या बछड्यांना त्यांच्या आईच्या भेटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्याचा संचार दिसून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या उसाच्या शेतात बछडे मिळून आले होते. यावेळी वनविभागाने यशस्वीपणे पिलांना आईची भेट घडवून आणली होती. तसेच आईने आपले पिले तोंडात धरून नेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *