भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणार्या स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या पूर्वजांना आणि त्यांचा कार्याला अभिवादन करणे ही आपली जबाबदारी आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहालमतवादी ते महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनातील एक प्रमुख नेते असा प्रवास राहिलेल्या लाला लजपतराय याचे आपल्याला स्मरण आणि त्यांना अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नाव म्हणजे लाला लजपतराय होय. लाला लजपतराय यांची आज (दि. 28) जयंती आहे.
भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात असे अनेक वीर होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान दिले. असेच एक वीर होते पंजाबचे सिंह लाला लजपतराय. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लाला लजपतराय हे असे स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 ला पंजाबमधील मोगा जिल्ह्यात धुडिके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील लाला राधाकृष्ण अग्रवाल हे प्राध्यापक आणि प्रसिद्ध उर्दू लेखक होते. आईचे नाव श्रीमती गुलाब देवीजी असे होते. लाला लजपतराय यांना लहानपणापासूनच वाचन व लेखनात रूची होती. त्यांनी 1885 मध्ये पंजाबच्या सरकारी कॉलेजमधून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि हिसारमध्ये वकिलीचा व्यवसाय सुरू केला. शेर-ए-पंजाब या उपाधीने सन्मानित लाला लजपतराय यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील लाल-बाल-पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. लाला लजपतराय निस्सीम देशभक्त, शूर स्वातंत्र्यसैनिक आणि एक चांगले नेता तर होतेच, तसेच ते एक उत्तम लेखक, वकील, समाजसुधारक आणि आर्य समाजीदेखील होते. लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1880 मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्याकरिता लाहौर येथे सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला व पदवी मिळवली. काही काळ त्यांनी वकिली केली, पण नंतर बँकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. लाला लजपतराय यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या 1888 व 1889 या वार्षिक सत्रादरम्यान प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. 1892 साली न्यायालयात सराव करण्याकरिता ते लाहोार येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बँक व लक्ष्मी विमा कंपनीची पायाभरणी केली. 1905 मध्ये ज्यावेळी बंगालचे विभाजन करण्यात आले त्यास त्यांनी कडाडून विरोध केला आणि या आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला. लाला लजपतराय यांना शेर-ए-पंजाब आणि पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहालवादी गटाची ओळख लाल-बाल-पाल अशी होती. त्यात लाला लजपतराय यांचा समावेश होता. त्यांची ओळख कष्टकर्यांचं आंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे आणि पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक, अशी आहे.
हिंदी-उर्दू-पंजाबीला प्रोत्साहन देण्याचं काम लजपतराय यांनी केलं होतं. लजपतराय यांना इंग्रजांना विरोध केला म्हणून म्यानमारच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
तिथून ते अमेरिकेला गेले व भारतात परत आले. देशात परतल्यावर लाला लजपतराय महात्मा गांधी यांच्या असहकर चळवळीचा भाग बनले होते. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं होतं. भारतातील कायद्यांतबदल करण्यासाठी सायमन कमिशन आलं होतं. मात्र, सायमन कमिशनमध्ये कोणताही भारतीय नसल्यानं विरोध सुरू झाला होता.
मुंबईत सायमन कमिशन पोहोचल्यावर सायमन गो बॅकचे नारे लावण्यात आले होते. पंजाबमध्ये सायमन कमिशनच्या विरोधाचं नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले होते. कमिशनला लाहोरमध्ये पोहोचताच काळे झेंडे दाखवले गेले. साँडर्सने विरोधातील आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीमार केला. लाठीचार्जमध्ये लजपतराय गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लजपतराय 18 दिवस रुग्णालयात होते. अखेर 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचं निधन झालं.
लाला लजपतराय यांच्या निधनानं भारतीयांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. या असंतोषातूनचं पुढं शहीद भगतसिंह आणि इतर सहकार्यांनी लाला लजपतराय यांच्यावरील लाठीमाराचा बदला घेतला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला साँडर्सला गोळ्या झाडून घेण्यात आला. लाला लजपतराय 1882 साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहोर वार्षिक उत्सवात सहभागी झाले आणि त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
1920 मध्ये त्यांना नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले. ब्रिटिश सरकारविरुद्ध शक्तिशाली भाषण देत त्यांना हादरवून सोडणारे लाला लजपतराय यांच्या देशाप्रति असलेली देशभक्ती आणि निष्ठा पाहता त्यांना ’पंजाब केसरी’ आणि ‘पंजाबचा सिंह’देखील म्हटले जाते. गुलामगिरीत असलेल्या
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता लाला लजपतराय यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला व शहीद झाले.
Lala Lajpat Rai, the Lion of Punjab in the Indian Freedom Struggle
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…