तीन टप्प्यांनंतरही निर्णय नाही; कास्ट्राईब संघटनेचा पाठिंबा
सिन्नर : प्रतिनिधी
राज्यभरातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (दि.2) पासून बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. तीन टप्प्यांत आंदोलनाचा इशारा देऊनही शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे कर्मचार्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. महसूलमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
विभागातील कर्मचार्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, विभागाचा नवीन आकृतिबंध मंजूर करणे, प्रवासभत्त्यात वाढ करणे, भूकरमापकांना स्वतंत्र रोव्हर मशिन उपलब्ध करून देणे, इंटरनेट डेटासाठी स्वतंत्र निधी देणे तसेच प्रत्येक भूकरमापकाला स्वतंत्र लॅपटॉप देणे या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी संघटना पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासनस्तरावर केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या सेवाकार्मी कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्र्यांनी तांत्रिक वेतनश्रेणी व नवीन आकृतिबंधाबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने राज्यातील विविध संघटनांनी एकत्र येत ‘कृती समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या आवाहनानुसार राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. कास्ट्राईब संघटना पूर्ण ताकदीने यात सहभागी झाली आहे. सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील संतोष मानकर, रामचंद्र खरे, विशाल खैरनार, प्रशांत पंडित, मोतीलाल चौरे यांच्यासह सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनाचे टप्पे असे…
दरम्यान, 18 फेब्रुवारीपासून आंदोलनाची टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली होती. 18 व 20 फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करण्यात आले. 23 ते 27 फेब्रुवारीदरम्यान अर्जित रजा अर्ज भरून असहकार आंदोलन राबविण्यात आले. 27 फेब्रुवारी रोजी जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तरीही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बेमुदत संपाची हाक देण्यात आली. या आंदोलनामुळे भूमी अभिलेख विभागाचे दैनंदिन कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या नोंदी, मोजणी, उतारे आदी कामांसाठी येणार्या सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत.
Land records employees begin indefinite ‘work shutdown’ from Monday
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…