नाशिक

सोनेवाडी खुर्द ठरले पहिले ‘ऑनलाइन रेशनकार्ड गाव’

महसूल समाधान शिबिर अभियानातून डिजिटल पारदर्शकतेकडे पाऊल

निफाड : तालुका प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानां’तर्गत निफाड तालुक्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. सोनेवाडी खुर्द हे गाव तालुक्यातील पहिले ‘ऑनलाइन रेशनकार्ड गाव’ म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमामुळे शिधापत्रिकाधारकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दुर्गामाता महिला बचतगट येथील रास्त भाव दुकानाचा परवानाधारक असून, गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत केली आहे. शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी, आधार संलग्नता आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची अंमलबजावणी पूर्ण केली आहे. गावात एकूण 111 शिधापत्रिकाधारक असून, त्यामध्ये एकूण 45 सदस्य असलेल्या 12 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका आणि 378 सदस्य संख्या असलेल्या 99 प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका यांचा समावेश आहे.
गावात एकूण लाभार्थी सदस्य संख्या 423 आहे. या सर्व लाभार्थ्यांना आता अंगठ्याच्या ठशावर धान्य वितरण करण्यात येत आहे. धान्य मिळाल्यानंतर त्वरित एसएमएसद्वारे माहिती प्राप्त होत आहे.
डिजिटल युगात ई- शिधापत्रिका हे स्मार्ट रेशन कार्डच्या दिशेने पहिले पाऊल ठरत आहे. या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता वाढली असून, धान्य वितरणाची नोंद रिअल-टाइम पद्धतीने होत असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.
माहिती अद्ययावत करणे, नावदुरुस्ती, सदस्य वाढवणे किंवा कमी करणे ही कामेही ऑनलाइन पद्धतीने सुलभ झाली आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी अतुल गायकवाड, पुरवठा निरीक्षक उल्हास टर्ले यांनी समन्वय साधला. ग्रामस्थ, महिला बचत गट आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा डिजिटल बदल शक्य झाला आहे. सोनेवाडी खुर्दचे ‘ऑनलाइन रेशनकार्ड गाव’ म्हणून झालेले रूपांतर हे निफाड तालुक्यासाठी सकारात्मक पाऊल मानले जात असून, ग्रामीण भागात डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.

महसूल समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून विविध सेवा गावपातळीवर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अनुषंगाने सोनेवाडी गावातील जुन्या, फाटलेल्या व जीर्ण शिधापत्रिका बदलून ई-शिधापत्रिका तयार केल्या आहेत. नागरिकांना या शिधापत्रिका आर.सी.एम.एस पोर्टलवरूनही डाउनलोड करता येतील. ई-शिधापत्रिकांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोनेवाडी गावात कॅम्प मोडवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
– विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढते आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होतो. सोनेवाडी खुर्दने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही या पद्धतीचा अवलंब करावा, अशी अपेक्षा आहे.
– डॉ.शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, निफाड

Sonewadi Khurd becomes the first ‘Online Ration Card Village’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago