इगतपुरी/शहापूर : प्रतिनिधी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारादरम्यान चॅनल नंबर 636 या ठिकाणी बोगद्याच्या पुढे मुंबई वाहिनीवर मंगळवारी रात्री 7.35च्या दरम्यान दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटांत विस्कळित झाली. दोन दिवसांपासून कोसळणार्या सततच्या पावसामुळे समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्याजवळ मातीचा मलबा व महाकाय दरड रस्त्यावर कोसळली. यादरम्यान सुदैवाने कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर नसल्याने दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील यंत्रणेने जेसीबी व हायड्रा क्रेनच्या मदतीने महामार्गावरील दरड व मातीचा मलबा दूर करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्ग पोलीस अधिकारी छाया कांबळे यांनी धाव घेतली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…