नाशिक

भरपावसाळ्यात लासलगाव तहानले; पाणीपुरवठा ठप्प

पाणीयोजनेत वारंवार बिघाड; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

लासलगाव : प्रतिनिधी
भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की लासलगावकरांवर आली आहे. गेल्या 12 ते 15 दिवसांपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा ठप्प असल्याने हजारो नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे नळांना थेंबभरही पाणी नसल्याने लासलगावकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागे 16 गावे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटणे, नांदूर परिसरातील वीजपुरवठा खंडित होणे, आणि लासलगाव-विंचूर रस्त्याच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनीचे झालेले नुकसान ही प्रमुख कारणे ठरत आहेत. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने जॅकवेलपर्यंत आवश्यक पाणीसाठा पोहोचत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
पाणीटंचाईमुळे घरगुती वापरासह व्यापारी व लघुउद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना दररोज 250 ते 300 रुपये खर्च करून खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट सुरू असल्याने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही नागरिकांनी नातेवाइकांकडे स्थलांतर केले असून, काहींनी लासलगाव सोडून नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा विचार सुरू केला आहे.

Lasalgaon parched in the peak of the monsoon; water supply halted.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

2 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

7 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

11 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

14 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

21 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

35 minutes ago