लासलगावला ३८ हजारांचे गोमांस पकडले

लासलगावला ३८ हजारांचे गोमांस पकडले

लासलगाव प्रतिनिधी

लासलगाव शहरातील बाजारतळ भागात गोवंशीय जनावरांच्या बेकायदेशीर मासंची विक्री करणाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे यातील दोन जणांना अटक केली असून या दोघांना मास विक्रीसाठी मदत करणाऱ्या तीन जणांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती लासलगाव पोलिसांनी दिली आहे

अलिम सलीम मोहम्मद,वय २१,रा.जागीरदार कॉलनी, येवला,अरबाज मोहम्मद युसुफ,वय १९ रा. मोमीनपुरा, येवला,एजाज युसुफ कुरेशी,रा.मोमीनपुरा, येवला,इसाक गफुर शाह,रा.बाजारतळ जवळ,लासलगाव,मंगला नेटारे पुर्ण नांव माहित नाही,रा.पुलाचे कोपऱ्याजवळ,लासलगाव यांच्या विरूध्द लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अलिम सलीम मोहम्मद व अरबाज मोहम्मद युसुफ यांना पोलिसांनी अटक केली आहे.

लासलगाव शहरातील बाजारतळ भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये येवला येथून आणून गोवंशीय जनावरांच्या मासंची विक्री करत असल्याची माहिती येथील बजरंग दल व गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती.सदर माहिती गोरक्षकांनी लासलगाव पोलीस ठाण्यात कळवली असता मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोथळे यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे,कैलास महाजन,सुजय बारगळ यांनी नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्यांना दोघे जण गोमांस विक्री करताना आढळून आले.या कारवाई मध्ये काळया रंगाची सेंट्रो कार क्रमांक एम एच ०२ ए पी ७३९ तसेच १९० किलो गोमांस व इतर साहित्य असा १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निफाड चे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि राहुल वाघ,पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोथळे,पो नि सुर्वे नाशिक ग्रामीण,सायखेडा स पो नि पप्पू काद्री,निफाड चे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे,पोलिस कर्मचारी कैलास महाजन,प्रदीप आजगे,योगेश शिंदे,भगवान सोनवणे,सागर अरोटे,औदुंबर,मुरडणर,दगु शिंदे,नंदकुमार देवडे,सुजय बारगळ किशोर लासुरकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *