लासलगाव बाजार समितीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.२८ टक्के मतदान

लासलगाव बाजार समितीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.२८ टक्के मतदान

लासलगाव प्रतिनिधी

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत एकूण २२९३ मतदारांपैकी ७६३ मतदारांनी मतदान केले असून,३३.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांनी दिली

जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र,जिल्हा परिषद समूह साधन केंद्र लासलगाव या ठिकाणी मतदान घेतले जात आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता मतदान घेण्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी शेतकरी विकास पॅनल तसेच शेतकरी पॅनल व अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आवारात मोठी गर्दी केली आहे.यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार हात जोडून विनती करताना दिसत होते.या वेळी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

4 hours ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

7 hours ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

7 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

7 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

7 hours ago

अवघ्या एक रुपयासाठी गमावले प्राण, नेमकी काय घडली घटना?

सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…

23 hours ago