लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद
लासलगाव:-समीर पठाण
केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे या मुद्द्यावर आज सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले.यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी या वेळी केली तसेच या बाबत केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल न घेतल्यास या पुढे राज्यव्यापी रस्ता रोको,रेल रोको करून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडून जेल भरो सारखे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारत दिघोळे यांनी या वेळी दिला.या वेळी नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले,चांदवड तालुका अध्यक्ष दत्तू गांगुर्डे यांच्या सह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साधारण अर्धा तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरु करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक करत आहेत.
खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००० हजार ते ३५०० रुपयांनी घसरले आहेत.यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
आज सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लीलावच्या पहिल्या सत्रात १०८८ वाहनातून कांद्याची बम्पर आवक दाखल झाली.या कांद्याला कमीत कमी ७००/-रुपये,जास्तीत जास्त २३३२/- रुपये तर सरासरी १८२५/- रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…