नाशिक

लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात

लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव शहरातील कोटमगाव रस्त्यावरील शिवकमल मंगल कार्यालयासमोर असलेल्या संपूर्ण टपरी मार्केटला शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने टपरी मार्केट मधील सर्व टपरी धारक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली अधिक माहिती अशी की,शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लासलगाव शहरातील कोटमगाव रस्त्यावरील शिवकमल मंगल कार्यालयासमोर असलेल्या संपूर्ण टपरी मार्केटला शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने सर्वच्या सर्व टपरी धारकांचे मोठे नुकसान झाले आहे.आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.ही घटना समजताच आजूबाजूतील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्याठिकाणाहून पाणी उपलब्ध करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर लागलीच पिंपळगाव बसवंत व चांदवड येथील अग्निशामक दलाची गाडी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली.घटना घडताच लासलगाव पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करून या सर्व टपरी धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने अग्निशामक गाडीची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.लासलगाव व परिसरासाठी अग्निशामक गाडीची मागणी बाजार समिती कडे करणार असल्याचे सरपंच जयदत्त होळकर यांनी सांगितले.

 

 

Bhagwat Udavant

Recent Posts

इंस्टाग्रामची मैत्री पडली महागात, वर्ग मित्राने मैत्रिणी सोबत केले असे काही….

इंस्टाग्रामवरून ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलीकडून लाखोंची वसुली - नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सिडको विशेष…

1 day ago

मल्ल विजय चौधरीने पटकावली चांदीची गदा

सटाण्यात रंगल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या सटाणा ः प्रतिनिधी स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या…

2 days ago

नाशिक रोड रेल्वे स्थानकात मॉकड्रिल

नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी पहलगाम (जम्मू-काश्मीर) घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला…

2 days ago

भाजपाच्या तिरंगा रॅलीत देशभक्तीचा महापूर

पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक ः प्रतिनिधी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या आक्रमणाला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे देशभरात…

2 days ago

नांदगावजवळ भीषण अपघातात तीन ठार

नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात तीन ठार सहा गंभीर जखमी मनमाड : आमिन शेख :…

2 days ago

सिन्नरला अवकाळीचे दोन बळी

सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) विजांचा कडकडाट,…

2 days ago