लासलगाव: प्रतिनिधी
दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टी नंतर आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे बघयाला मिळाले.जिल्ह्यातील सर्वच बाजार समितिमध्ये आज उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दिवाळी पुर्वी शुक्रवारी २१ तारखेला लासलगांव बाजार समितीमध्ये ऊन्हाळ कांद्याची १४ हजार ७९२ क्विंटल आवक झाली होती तर बाजारभाव कमीत कमी ६००/- रु,जास्तीत जास्त २३५० रू तर सरासरी १८६० रू प्रती क्विंटल होते.तर दिवाळीनंतर आज दि.३१ तारखेला लासलगांव बाजार समितीमध्ये ऊन्हाळ कांद्याची सकाळच्या सत्रात ५७० नगाची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी १०११/- रू,जास्तीत जास्त ३१०१ रु तर सरासरी रू २४५०/- रु प्रती क्विंटल होते.
परतीच्या पावसाचा कांदा रोपांना तडाखा बसल्याने नवीन लाल कांद्याच्या हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे.साठवणुकीचा कांदाही कमीच असल्याने दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती प्रमाणात मिळणार,याबाबत प्रश्नचिन्हच आहे.सध्या बाजारात जुना कांदा उपलब्ध आहे.जुन्या कांद्याचा साठा संपत चालला आहे.पावसामुळे चाळीत साठविलेल्या जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे.
कांदा भाव वाढीचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होत आहे.चाळीत साठवलेला कांदा हवामान बदलामुळे सडला असून त्याचे वजन देखील कमी झाले आहे.गेली पाच महिने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अतिशय स्वस्तात कांदा विक्री केला आहे.मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा संपत आला असताना कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.यामुळे वाढलेल्या दराचा खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
राजा बाबा होळकर
कांदा उत्पादक शेतकरी लासलगाव
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…