मुंबई प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या 3 मे च्या अलटीमेंटम नंतर काल गृह विभागाची बैठक घेण्यात आली. यापुढे धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिस परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत. परवानगी शिवाय लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे. या संबंधी लवकरच पोलीस महासंचालक यांच्या सोबत बैठक घेणारं असल्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पोलीस आयुक्त पांडे यांचाही इशारा
नाशिकमधील अनधिकृत भोंगे लावण्यात आलेले असल्यास कारवाईचा इशारा आयुक्त पांडे यांनी दिला आहे. परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू नये अन्यथा चार महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो असा इशारा पांडे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत 3 मे पर्यंत भोंगे न काढल्यास सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आज ठाकरे सरकारने लाऊडस्पीकर बाबत निर्णय घेतला.