नाफेडमार्फत कांदा खरेदी

लासलगाव प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार ग्राहकांच्या हितासाठी नाफेड व महाएफपीसी चा महाओनिअन हा संयुक्त उपक्रमाअंतर्गत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीला राज्यासह मध्य प्रदेश आणि गुजरात येथील काही बाजार समित्यांमध्ये शनिवार पासून सुरुवात झाली आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून शनिवारी पहिल्याच दिवशी 10 वाहनातून 150 क्विंटल कांद्याची खरेदी केली त्याला कमाल 1197 रुपये ,किमान 1015 रुपये तर सर्वसाधारण 1141 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाले

मागणीच्या तुलनेत देशांतर्गत कांद्याचा पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आली होती.शनिवार पासून नाफेड मार्फत केंद्र सरकारची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या खरेदीला सुरुवात झाल्याने नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील बल्हेगाव येथील अनिल ताडगे या कांदा उत्पादक शेतकऱ्याला गुरुवारच्या तुलनेत शनिवारी लासलगाव बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यातून फायदा झाल्याचे दिसून आले.

गुरुवारी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला 965 रुपये इतका प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांने खरेदी केलेल्या कांद्याला बाजार भाव मिळाला होता.त्यातीलच कांदा शनिवारी पुन्हा लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणला असतात त्या कांद्याला नाफेडने 1141 रुपये प्रति क्विंटलला बाजार भावाने खरेदी केल्याने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने समाधान व्यक्त करत नाफेडने जास्तीत जास्त कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळवून देण्याची मागणी केली.

नाफेड मार्फत केंद्र सरकारची शनिवार पासून लासलगाव बाजार समितीत कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे.व्यापारी आणि नाफेड मध्ये बाजार भावाची स्पर्धा झाल्यास नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.आज जरी कांद्याच्या बाजार भावात पाहिजे तितका फायदा दिसून आला नसेल मात्र येणाऱ्या दिवसात नक्कीच शेतकऱ्यांना नाफेड खरेदीचा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करुन आणल्यास योग्य बाजार भाव मिळण्यास मदत होईल

सुवर्णा जगताप,सभापती बाजार समिती लासलगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *