महाराष्ट्र

नाशिकची हास्य  चळवळ

नाशिकची हास्य  चळवळ
    काल आज आणि उद्या.
अँड.वसंतराव पेखळे.
मोबा.नं.9373924328
अध्यक्षः जिल्हा हास्ययोग समन्वय समिती नाशिक.
हास्य जगतगुरु डाॅ.मदनजी कटारिया यांनी ५ लोकांना घेऊन  २९  वर्षापूर्वी मुंबई  येथे  जगातील पहिल्या  हास्य  क्लबची  स्थापना  केली.त्यानंतर  पुढच्याच वर्षी  कै.देवेंद्र  जावरे यांनी नाशिक  मध्ये  नंदिनी या हास्य क्लब च्या  माध्यमातून  हास्ययोग  चळवळीची मुहुर्तमेढ रोवली. आज १२० हुन अधीक देशात डाॅ.मदनजी कटारिया यांनी हास्ययोग  चळवळ प्रचलित  केलेली असुन आपल्या  देशात  हजारो हास्य क्लब  कार्यरत  आहेत.
येथे मुद्दामहून  नमुद करावेसे वाटते की नाशिक  महानगरात  १२५ हुन अधिक हास्य क्लब  कार्यरत  आहेत.आणि नाशिक  जिल्ह्यातील  ग्रामीण  भागात देखील  हास्ययोग प्रचार  प्रसाराने जोर धरलेला आहे..
काही वर्षांपूर्वी  विविध हास्य क्लब  यांचेत  समन्वय  साधणेसाठी व हास्ययोग प्रचार  प्रसाराची  चळवळ वाढीस लागणेसाठी जिल्हा हास्ययोग समन्वय समितीची स्थापना  करणेत आली.मला सांगावयास अभिमान  वाटतो की, माझ्या  अडीच वर्षाच्या  समिती अध्यक्ष  पदाचे कारकिर्दीत  नाशिक  महानगरातील  विविध  भागात नवीन नवीन हास्य कलब सुरु झाले ,सुरु होत आहेत व भविष्यात  देखील  सुर राहाणार  आहेत.
सर्व  हास्य क्लब अध्यक्ष, सदस्य यांचेशी वैयक्तिक  संवाद साधुन हास्ययोगाचा प्रचार  प्रसार  करणेकामी  त्यांना  प्रोत्साहित  करणेत हास्ययोग समन्वय  समिती चे माध्यमातून आम्ही  यशस्वी  झालेले आहोत. जिल्हा हास्ययोग समन्वय  समिती तर्फे  दरवर्षी आयोजित  करणेत येणारै  पारंपारिक  हास्य  दरबार  व जागतिक हास्य दिन  कार्यक्रम  नियमितपणे  राबविले जातातच .परंतू हास्य  परिवारातील  सदसयांना केंद्र  बिंदू  मानून  त्यांना  कार्यक्रमात  सांस्कृतिक व इतर  कार्यक्रम  सादर  करणेस संधी देणे.हास्य  दिंडी फॅन्सी  ड्रेस  स्पर्धांमध्ये  सर्वांना  सामावून  घेणे .याशिवाय विभागावर  विविध सामाजिक  सांस्कृतिक व हास्ययोग  विषयक  उपक्रम  राबविणेसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील   असतो व भविष्यात  देखील  राहाणार  आहोत.
हास्य  कलब हा फक्त  वयस्कर  लोकांसाठीच असतो ही जुनी समजुत लोकांच्या  मनातुन काढून  टाकणेत  काही अंशी आम्ही यशस्वी  झालेलो आहोत.भविष्यात  या साठी आम्ही  जास्त  प्रयत्नशील  राहणार  आहोत. कारण आता जे जे नविन नविन हास्य क्लब  सुरु होत आहेत  त्यात तरुण वर्गाचा  सहभाग  मोठ्या  प्रमाणावर  वाढत आहे.
आम्ही सर्व  हास्य प्रेमी नशिबान आहोत की,आंतरराष्ट्रीय हास्ययोगाचे जनक डाॅ.मदनजी कटारिया व सौ.माधुरीजी कटारिया यांनी जागतिक हास्ययोगाचे मुख्यालय नाशिक येथे स्थलांतरित  केले आहे.आणि ते देखिल  नाशिक  येथेच स्थायिक  झालेले आहेत.त्यामुळे हास्य  देवताच आपल्या  अंगणी  आल्याचे भाग्य  आम्हाला  मिळालेले आहे..
आमचा  संपूर्ण  हास्य  परिवार नेहमीच उत्साही,  आनंदी , क्रियाशील व सकारात्मक असतो .सर्वच  हास्य  क्लब मध्ये  नियमितपणे योगा,प्राणायम व हास्य  योगाचे सराव केले जातात.शिवाय  मधुन मधुन संगीतमय  हास्ययोगा,सिंगिंग डान्सिंग  या गोष्टींचा देखील  त्यात  समावेश  केला जातो. प्रत्येक  हास्य  क्लब मध्ये  नियमितपणे विविध हास्य  प्रकार घेतले जातात.परंतु भविष्यात या हास्य  प्रकार  व  व्यायाम  प्रकारांना  नविन नविन हास्य  तंत्रज्ञानाची जोड मिळावी या साठी आम्ही प्रयत्नशील  राहणार आहोत.
जिल्हा हास्ययोग समन्वय समिती नाशिक तर्फे  भविष्यात  अनेक योजना व उपक्रम  राबविण्यात येणार आहेत.मुख्य म्हणजे  समितीच्या  सभा, विविध  कार्यक्रम  हास्य क्लब चे वैयक्तिक  कार्यक्रम,  या साठी हक्काची  जागा मिळविणे,प्रत्येक हास्य क्लब  जेथे चालतो ती उद्याने, सभागृहे या ठिकाणी येणार्या  समस्यांचे  व अडचणींचे निवारण करणे ,काही हास्य कलब उघड्यावर  चालतात पावसाळ्यात ते बंद पडतात त्यासाठी  कायमस्वरुपी  नियोजन  करणे. अनेक  हास्य कलब विविध  सामाजिक  सांस्कृतिक  शैक्षणिक उपक्रम  राबवित असतात त्यासाठी त्यांना  मार्गदर्शन  करणे,विभागवार विभाग व संपर्क प्रमुख  यांनी त्या  त्या  भागातील हास्य  क्लबला  भेटी देणे त्यांच्या  समस्या  प्रश्न  समजावून  घेणे. हास्य दरबार व जागतिक  हास्य दिन हे कार्यक्रम  समिती तर्फे  नियमित  घेतले जातातच या शिवाय विभागावर  प्रासंगिक हास्य  मेळावे आयोजित  करणे.या सारख्या  अनेक योजना विचारधीन आहेत त्या  निश्चित पणे राबविल्या  जातील याची आम्हास  खात्री  आहे.
आमचा दावा आहे की,हास्ययोग हा संपूर्णपणे  सर्वांगसुंदर असा शारिरीक  व मानसिक  व्यायाम प्रकार  आहे. हास्ययोग व्यायामापासून मिळणारे  मुलभुत फायदे  म्हणजे  आपला मुड खराब असेल तर तो हास्ययोगाचे माध्यमातून  बदलुन आनंदी होतो व आपल्यात  उत्साह  संचारतो,ताणतणाव दुर होतो, सकारात्मक  विचारसरणी  वृद्धिंगत  होते,सांघिकरीतया केला जात असल्यामुळे एकमेकांचे विचारांशी जोडले जातो,जीवन शैली सुधारते.आणि आणखी बरेच शारिरीक फायदे आहेत.
देशाचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मी जाहीर अवाहन करतो की,  नाशिक महानगरातील आमच्या कोणत्याही  हास्ययोग क्लब ला विनामूल्य  जोडले जा.नियमित  हास्य क्लबला या . आम्ही भविष्यातील  आपलया आनंदी व आरोग्यमय  जीवनाची या निमित्ताने हमी देतो.
Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

1 day ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

1 day ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

1 day ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

1 day ago