मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा मुदत नोव्हेंबर मध्ये संपत आहे. त्यामुळे निवडणूक घेण्याची तयारी आयोगाने पूर्ण केली आहे आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंड या चार राज्याचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे, महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान होणार आहे,