महाराष्ट्र

नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समधे कर्करोग विभागाची सुरूवात

नाशिक प्रतिनिधी
प्रत्येक गरजू रुग्णाला सर्वोत्तम उपचार आणि सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने वोक्हार्ट हॉस्पिटल आणि नाशिक आँन्कोलाँजी समुहाचा सामुहीक प्रयत्न.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त, कर्करोगावर मात केलेला व्यक्तींचा विशेष सत्कार
देशात सध्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरची वाढती रुग्णसंख्या पाहता वोक्हार्ट रूग्णालय आणि नाशिक ऑन्कोलॉजी समुहाच्या सहकार्याने नाशिक आणि आसपासच्या भागातील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्करोग विभागाची सुरूवात करण्यात आली आहे.
तसेच जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने रुग्णालयाने कर्करोगमुक्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला नाशिक ऑन्कोलॉजी ग्रुपचे डॉ.नागेश मदनूरकर, नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या केंद्र प्रमुख डॉ. रेश्मा बोराळे,  मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संदीप ईशी, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शैलेश बोंदार्डे, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अजय जाधव, ,  रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट  डॉ भूषण नेमाडे, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट  डॉ. मंगेश कोरडे, ऑन्कोलॉजिस्ट  डॉ संजय अहिरे, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ विनायक शेनागे आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ सुलभचंद्र भांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. तंबाखू, मद्यपान यांचे सेवन, लठ्ठपणा, बदलती जीवनशैली त्याचबरोबर पर्यावरणीय घटक, आनुवंशिकता आणि कौटुंबिक इतिहास हे देखील कर्करोगाच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येस कारणीभूत ठरत आहेत. कॅन्सर रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्सने मोठा पुढाकार घेतला असून यामुळे आता एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
वेळीच तपासणी न केल्यास, निदान आणि उपचारांना विलंब झाल्याने कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाला कर्करोगाविषयी शिक्षित करणे तसेच वेळीच हस्तक्षेप करण्यास प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे. स्तन, अन्ननलिका, अंडाशय, गर्भाशय, पित्ताशय आणि पित्त नलिका, प्रोस्टेट, मूत्राशय, थायरॉईड, यकृत, हाडे, कोलन, गर्भाशय ग्रीवा आणि ल्युकेमिया यासारख्या विविध कर्करोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालयाचा ऑन्कोलॉजी विभाग सज्ज झाला आहे.  कर्करोगाच्या रूग्णांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमात एकत्रित आल्याबद्दल आम्ही नाशिक ऑन्कोलॉजी ग्रुपचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया डॉ रेश्मा बोराळे, केंद्र प्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिक यांनी व्यक्त केली.
कर्करोगाच्या रूग्णांना उपचार देण्यासाठी नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटल सोबत काम करताना आम्हाला अतिशय  आनंद होत आहे. हॉस्पिटलच्या सहकार्याने आम्ही रुग्णांना चोवीस तास सुविधा देऊ शकतो. प्रत्येक गरजू रुग्णाला सर्वोत्तम उपचार आणि सेवा प्रदान करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलने सर्व सुविधा, आयसीयू आणि ओटी एकाच छताखाली असण्याचा बेंचमार्क सेट केला आहे. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार यंत्रणा सज्ज करण्यात आले आहे. हा ऑन्कोलॉजी विभाग कर्करोगाच्या रूग्णांसाठी वरदान ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया नाशिक ऑन्कोलॉजी ग्रुपचे डॉ नागेश मदनूरकर यांनी दिली.
हे ही वाचा :
Devyani Sonar

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

2 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

3 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

3 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

3 days ago