नाशिक

पोलिसाकडून वकिलाला बेदम मारहाण

बार असोसिएशन संतप्त; पोलिसाचे तडकाफडकी निलंबन

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलीस चौकीतील ठाणे अमलदाराने कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना काल घडली. या घटनेनंतर नाशिक बार असोसिएशनने निषेध करत थेट रस्त्यावर उतरत निदर्शने केली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना बार असोसिएशनने निवेदन दिल्यानंतर आयुक्त कर्णिक यांनी गंभीर दखल घेत या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन केले.
जिल्हा न्यायालयातील वकील अ‍ॅड. तुषार दोंदे हे त्यांच्या सहकारी कामगार श्रीकांत नावंदर यांच्या आत्महत्येनंतर कर्तव्य बजावण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले होते. तेथील पोलिस चौकीतील ठाणे अमलदार विश्वजित राणे यांच्याकडे त्यांनी घटनेशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी दोंदे यांना धक्काबुक्की करत, तसेच शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अ‍ॅड. दोंदे यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा झाल्या. हा प्रकार बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना समजताच सर्व पदाधिकारी जिल्हा न्यायालयाबाहेर जमले आणि त्यांनी निदर्शने करत या पोलिसाला तत्काळ निलंबित करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना असोसिएशनने निवेदन दिले.
या निवेदनात संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित करण्यात येऊन अटक करण्याची मागणी केली. वकिलांच्या मागणीनंतर आयुक्त कर्णिक यांनीही संबंधित ठाणे अमलदार विश्वजित राणे यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत विश्वजित राणे यांना निलंबित करण्यात आले असून, लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन झाल्यास स्वतंत्र शिस्तभंग कारवाई करण्यात येणार आहे.निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांना निर्वाहभत्ता देण्यात येणार असून, या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेचा निषेध करत नाशिक बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. हेमंत शंकर गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संबंधित पोलीस हवालदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या निवेदनाची माहिती प्रत न्या. एस. डी. जगमलानी यांनाही देण्यात आली आहे.

वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वकील आपल्या न्यायालयीन कामकाजासाठी गेले असताना पोलीस कर्मचार्‍यांकडून अशा प्रकारचा हल्ला होणे, हे अत्यंत दुर्दैवी व बेकायदेशीर असल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे. वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Lawyer brutally beaten by police

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago