सिन्नरला धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
सिन्नर: प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमिष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजून सामूहिक बलात्कार करून मारहाण केल्याची घटना शहरातील वैदू वाडीत शनिवारी दि. ४ उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुटटी, पुर्णनाव माहीत नाहीत, प्रेरणा, पुर्णनाव माहीत नाहीत, भाउसाहेब उर्फ भावडया दोडके, राहुल फादर पुर्णनाव माहीत नाहीत, एक अनोळखी इसम अंदाजे 40 वर्ष वयाचा सर्व रा. सिन्नर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित राहुल फादर याने पिडित महिलेला धर्मातराचे प्रलोबन दाखवुन गुलाबी रंगाचे पाणी पाजुन गुंगी आणुन व बाकीच्या संशयितांनी पिडित महिलेला डांबुन ठेवुन व आरोपी क्र. 3 ते 5यांनी तिचेशी आंगलट करून तिचेवर वेळो वेळी आळीपाळीने बलात्कार करून तिचे मुलांना भिक मागण्यास भागपाडुन तीस शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे,