येवला तालुक्यातील घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील पारेगाव येथील सुरासे यांच्या वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. दरम्यान, येवला तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समजलेली माहिती अशी की, येवला तालुक्यातील पारेगाव येथील सतीश दौलत सुरासे यांच्या वस्तीवरील कुत्र्यावर गुरुवारी (दि. 18) बिबट्याने हल्ला करून जबड्यात धरून कुत्र्याला फरफटत नेले. दरम्यान, बिबट्याने सदर कुत्र्याला फरफटत नेऊन ठार केले आहे. सदरचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेर्यांत कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. येवला शहरापासून पारेगाव हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांतदेखील बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. पारेगाव येथे बिबट्या भटकंती करीत असेल तर बिबट्या येवला शहरातदेखील येण्याची दाट शक्यता आहे. शहरात बिबट्या येऊ नये, यासाठी वन विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. पारेगाव शिवार तसेच पारेगाव परिसरात वन विभागाने पिंजरा लावणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची दिरंगाई वन विभागाने करू नये, अशी मागणी येवला शहरातील नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीदेखील येवला तालुक्यातील मुखेड, उंदीरवाडी, लौकी शिरसगाव शिवार आणि आता पारेगाव शिवारात बिबट्याने शिरकाव केला आहे. बिबट्याच्या सतत वावरामुळे नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण
येवला तालुक्यात बिबट्याचा संचार वाढला असून, बिबट्याच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येवला शहरात येत असतात. बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालयात येताना दुचाकी किवा सायकलने प्रवास करीत असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर आणि दहशत निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
Leopard attacks dog in Paregaon सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…