नाशिक

दिंडोरी परिसरातून बिबट्या जेरबंद; मात्र नागरिकांमध्ये दहशत कायम

दिंडोरी : वनविभागाने शिताफीने कामगिरी बजावत दिंडोरी येथील जाधव वस्तीवर सोमवारी (दि.1) पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी हालचाली केल्या. अखेर रात्रीच्या सुमारास बिबट्यास जेरबंद केले. मात्र, अद्यापही बिबट्याची दहशत थांबलेली नाही.
बिबट्याचा वावर संपता संपेनासा झाला असून, दिंडोरी तालुक्यात एकापाठोपाठ बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, वन विभाग उदासीन का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. बिबट्याने वनारवाडी येथील युवती, त्यानंतर पाच वर्षीय बालकाचा बळी घेतला. या घटनेनंतर संतप्त जनसमुदायाने काही काळ नाशिक-सापुतारा रास्ता रोको करून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी होती. त्यानंतर दिंडोरी येथील जाधव वस्तीवर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद केले. हा बिबट्या मादी असून, बालकाचा बळी घेणारा बिबट्या होता की मादी हे समजले नाही. त्यामुळे परिसरात अजूनही दहशत कायम आहे. यावेळी वन विभागाने पिंजर्‍यासहित बिबट्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी अशोक काळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जेरबंद बिबट्यावर उपचार सुरू असून, रविवारी रात्री श्याम जाधव यांच्या घराकडे दोन बिबटे महिलांना दिसून आले. त्यामुळ परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago