नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
पिंपळगाव खांब परिसरात पुन्हा एकदा बिबट्या जेरबंद झाला आहे. महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लावलेल्या पिंजर्यात हा तिसरा बिबट्या गुरुवारी सकाळी अडकला. वन विभागाने दोन ते तीन किलोमीटर परिघात तब्बल 15 पिंजरे लावले होते, त्यापैकी एका पिंजर्यात हा बिबट्या अडकला.
याआधी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाला येथे साडेतीन वर्षांच्या आयुष भगत याला दारातून उचलून नेत बिबट्याने ठार केले होते. या हृदयद्रावक घटनेने नाशिक शहर व जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींनी वन विभागावर मोर्चा काढत तातडीने बिबटे पकडण्याची मागणी केली होती.
वन विभागाने या भागात बिबट्यांच्या शोधासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करून 15 पिंजरे लावले होते. आठ दिवसांपूर्वी याच परिसरात दोन बिबटे पकडण्यात आले होते. महालक्ष्मीनगर मळे व भवानीनगर मळे परिसरात हे दोन्ही बिबटे जेरबंद झाले होते. तथापि, अजूनही परिसरात बिबटे फिरत असल्याची भीती ग्रामस्थ व माजी नगरसेवक केशव पोरजे आणि जगदीश पवार यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजर्यात अडकलेला निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या म्हसरूळ येथे हलविण्यात आले. या भागात अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह
कायम आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…