नाशिक

रविवार कारंजा परिसराचा जीव वाहतूक कोंडीने गुदमरला!

एकीकडे मंडईचे पाडकाम, दुसरीकडे विक्रेत्यांनी मांडले ठाण

नाशिक : अभय पांडे
रविवार कारंजा परिसरात एकीकडे यशवंत मंडई पाडण्याचे सुरू असताना, दुसरीकडे या भागात आजूबाजूच्या परिसरात विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. तसेच रिक्षाचालकही याच ठिकाणी प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे पादचार्‍यांना व वाहनधारकांना कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचेही दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे तारेवरील कसरत ठरत आहे.
रविवार कारंजा सर्कलवर रिक्षांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या राहतात, त्यामुळे वाहनांना मार्ग मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय, मंडई परिसरात नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येत असल्याने गोंधळाचे वातावरण कायम
राहते.
नगरपालिकेने यशवंत मंडई इमारत पाडण्याचे सुरू केले असले तरी त्याच्या आजूबाजूचा अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यांची क्षमता कमी होत असून, वाहतुकीसह अग्निशमन किंवा आपत्कालीन सेवांसाठी मार्ग मोकळा ठेवणे कठीण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात कारवाईचा वेग मंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे या परिसरातील व्यापार, वाहतूक व्यवस्था व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमण पूर्णपणे हटवले नाही तर मंडई परिसर पुन्हा कोंडीतच राहणार. रिक्षांसाठी ठराविक स्टॅण्ड बनवला पाहिजे; अन्यथा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. प्रशासनाने धूळ व मलबा व्यवस्थापनावरही लक्ष द्यावे. मनपाकडून पाडकामाचे काम सुरू असले तरी अतिक्रमणावरील कारवाई मंदावल्याचे दिसत आहे.

रिक्षांचा गराडा, पोलिसांचे दुर्लक्ष
काही वेळा फक्त औपचारिक कारवाई करून पुन्हा व्यापारी त्याच ठिकाणी परत येतात. वाहतूक पोलिसांनी रिक्षांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. यशवंत मंडई तोडकाम ही आवश्यक बाब असली तरी त्याच वेळी अतिक्रमण हटवणे, वाहतूक शिस्त राखणे आणि रिक्षांसाठी नियोजित स्टँड तयार करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर रविवार कारंजा परिसरातील समस्या शहरातील एक मोठा डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago