चांदवड : वार्ताहर
तालुक्यात तळेगाव रोही शिवारात शनिवारी (दि. 21) सकाळी सातच्या सुमारास लक्ष्मीनगर वस्तीजवळ एका मोरीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पकडले. स्थानिक नागरिक, वनविभागाच्या अथक प्रयत्नांमुळे हा बिबट्या जेरबंद झाला.
तळेगाव रोही येथील गट क्रमांक 318 गावठाण जमिनीत शिवाजी जिरे यांच्या घरासमोर असलेल्या विहिरीत बिबट्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली. येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वन कर्मचारी आणि निफाडच्या बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बिबट्या तळेगाव-मनमाड-वडगाव पंगू रस्त्यालगत असलेल्या मोरीमध्ये लपून बसल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले. बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती, ज्यावर चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नियंत्रण मिळवले. उपवनसंरक्षक उमेश वावरे आणि सहायक वनसंरक्षक शिवाजी शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली. रेस्क्यू टीमने नियोजनबद्ध पद्धतीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. यशस्वी मोहिमेमध्ये येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल मनमाडचे जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक विसापूर सोनाली वाघ, वनरक्षक पंकज नागपुरे, गोपाल राठोड, बाळकृष्ण सोनवणे, गणेश चव्हाण, सुनील भुरुक, निफाडचे आधुनिक बचाव पथक आणि पोलीस पाटील तळेगाव रोही यांनी परिश्रम घेतले.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…