मखमलाबाद परिसरात बिबट्याचा मृत्यू

१५ ते २० दिवसांत दोन जनांवरांचा पाडला फडशा ”
मखमलाबाद परिसरात बिबट्याचा मृत्यू

बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त
पंचवटी : सुनील बुनगे
शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असतानाच मखमलाबाद परिसरातील मळे भागात देखील बिबट्यांचा वावर वाढला असून मंगळवारी सकाळच्या सुमारास महाले मळ्यात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता . वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याचा घटनास्थळी पंचनामा करून शवविचछेदनास बिबट्यास घेऊन गेले . दरम्यान बिबट्याचा मृत्यू कशाने झाला असावा याबाबत त्याच्या शवविचछेदनानंतर स्पष्ट होईल असे वनरक्षक सचिन आहेर यांनी सांगितले.
मखमलाबाद परिसरातील गंगापूर कॅनॉल,जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसर , महाले मळा आदी भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागातील अनेक कुत्री , वासरू, गायींचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला आहे. मळे भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून शेतीत काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिन्यात सिडको परिसरात , माडगसांगवी , नाशिकरोड परिसरात वनविभागाने बिबटे जेरबंद केले आहेत. तर गंगापूर कॅनॉल कडे बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच महिन्यात पंधरा ते वीस दिवसापूर्वी जुना चांदशी रत्यावरील काकड मळे परिसरात तानाजी काकड या शेतकऱ्याचे वासरू बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी पडले . त्यानंतर रविवार( दि.२४ रोजी ) च्या मध्यरात्री याच रस्त्यावरील थोरात मळ्यातील दीपक थोरात यांचे तेरा महिन्याच्या गायीचा बिबट्याने फडशा पाडला. पंधरा ते वीस दिवसातली ही याच रस्त्यावरील दुसरी घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
थोरात यांची गाय बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी पडत नाही तोच याच भागातील थोरात यांच्या मळ्याशेजारी महाले यांच्या शेतातील बांधावर (सोमवार दि.२५ ) रोजी च्या मध्यरात्री सुमारास बिबट्या मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बिबट्या बांधावर पडलेल्या अस्वस्थेत महाले यांच्या शेतात काम करणाऱ्याला दिसला . तोही घाबरून गेला परंतु बराच वेळ होऊन बिबट्या हालचाल करत नसल्याने त्याने जवळ जाऊन बघितले असता तो मृत्युमुखी पडल्याचे दिसले .त्या मयत बिबट्याचा फोटो व्हायरल झाल्याने नाशिक प्रादेशिक परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांना माहिती कळविल्यानंतर त्यांनी वनरक्षक सचिन आहेर यांना घटनास्थळी पाठविले . याठिकाणी सचिन आहेर , वनकर्मचारी सोमनाथ निंबेकर , पांडुरंग खाडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबट्याला शिवविच्छेदना करता घेऊन गेले . या घटनेची माहिती म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू पाचोरकर , पोलिस उपनिरीक्षक रमेश घडवजे व कर्मचारी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 

शिवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल

मखमलाबाद परिसरातील महाले यांच्या शेताच्या बांधावर मृत्युमुखी पडलेला बिबट्या हा नर असून त्याचे वय साधारण ७ ते ८ वर्ष असून घटनास्थळी पंचनामा करून त्याच्या शिवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू कशाने झाला ते स्पष्ट होईल . शिवविच्छेदनानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात येतील .

सचिन आहेर
वनरक्षक , नाशिक

पिंजरा बसविण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून मखमलाबाद परिसरातील जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसर , गंगापूर कॅनॉल, महाले मळा आदी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या घरी जाताना भीती वाटत असते. त्यामुळे याभागात वनविभागाने पिंजरा बसविण्याची मागणी केली जात आहे.

ओंकार महाले ( महाले मळा)
गोकुळ काकड ( संचालक मखमलाबाद सोसायटी )
शिवाजी काकड ( जुना चांदशी रोड , काकड मळा)

ग्रामस्थांची गर्दी , अन् फोटो सेशन

बिबट्याचे नाव ऐकताच किंवा समोर बघताच भल्या भल्यांची गाळण उडते . मात्र मखमलाबाद गावातील महाले यांच्या मळ्यात बिबट्या मृत्युमुखी पडल्याचे माहीत पडताच गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी महाले यांच्या मळ्यात मृत्युमुखी पडलेला बिबट्या बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. अनेक युवक देखील गेले होते. याठिकाणी जात मयत बिबट्याचे फोटो , काढून फोटो सेशन करत होते . काही वेळात वणरक्षक सचिन आहेर आल्यानंतर बिबट्यावर कपडा टाकून झाकून ठेवला .

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

5 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

6 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

15 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago