वडनेर गेट परिसरात बिबट्या अखेर जेरबंद

नाशिकरोड : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात अखेर अडकला. या बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. यामुळे थोडासा का होईना दिलासा नागरिकांना मिळाला आहे. वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब परिसरात असंख्य बिबटे असून, ते रात्रीच्या वेळी बाहेर निघतात.
नागरिकांवर हल्ले करतात. त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यांत बिबट्याने या परिसरातील वडनेर दुमाला, वडनेर गेट या भागातील दोन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. परिणामी या घटनेनंतर माजी नगरसेवक केशव पोरजे तसेच योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, भैया मनियार, सागर निकाळे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर वन विभागाने वडनेर दुमाला व परिसरात 18 पिंजरे व 15 कॅमेरे लावले होते. दरम्यान, काल वडनेर गेट परिसरात राजपूत कॉलनी येथे बिबट्या वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिसताच त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *