नाशिक: प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही,टवाळखोरांनी उच्छाद मांडला असून, खुनाचे सत्र सुरूच आहे. आज मध्यरात्री टवाळखोरांच्या हल्ल्यात नाशिकरोडच्या गोरेवाडी भागात एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा ठाकरे असे या युवकाचे नाव आहे. हल्ल्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस तपास करीत आहेत.
शहरात दर दोन दिवसाआड खुनाच्या घटना घडत आहेत. मागच्या आठवड्यात श्रमीकनगर येथे, इंदिरानगर येथील कॅफेमध्ये खुनाच्या घटना घडल्या होत्या. कालच मध्यरात्री उपनगर हद्दीत टवाळखोर यांनी तीन ते चार गाड्या फोडल्या होत्या. आज मध्यरात्री टवाळखोर यांनी धुडगूस घातला होता. शहरातील गुन्हेगारी चा मागच्याच आठवड्यात मंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतला होता.