नाशिक

छ. संभाजीनगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बळी

निफाड : तालुका प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गोंडेगाव फाट्याजवळ रविवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत झालेला बिबट्या अंदाजे 7 ते 8 महिने वयाचा असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
निफाडच्या गोदाकाठ परिसरात उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. साहजिकच या परिसरात बिबट्यांचा सर्वाधिक असल्याची बाब वेळोवेळी समोर आली आहे, यापूर्वीदेखील याच महामार्गावर शिवरे फाटा, नागपूर फाटा येथे देखील वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी सायंकाळी गोंडेगाव फाटा येथे महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून बिबट्या मृत झाल्याची घटना घडली. बिबट्या मृत झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे निफाड वनपरिक्षेत्र अधिकारी विजय दोंदे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीच मृत बिबट्यास निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत आणले. मृत बिबट्यावर रोपवाटिकेत अंतिम संस्कार करण्यात आले.
निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी काळजी घ्यावी. तसेच आपली पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. वस्तीवर राहणार्‍या नागरिकांनी रात्रीच्या वेळेस एकट्याने घराबाहेर पडू नये. वस्तीवर राहणार्‍या नागरिकांनी रात्रीच्या वेळेस लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये. आपल्या परिसरात दिवे लावावेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Leopard killed in vehicle collision on Ch. Sambhajinagar road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago