नाशिक

पळसे परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीती

नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक शहर व परिसरात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्यामुळे अनेक दिवसांपासून ग्रामस्थ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.अशातच पळसेत काल रात्री 9 वाजेच्या सुमारास अशोक सावळीराम गायधनी यांच्या थडीला दिसला तर एकनाथ किसन गायधनी यांच्या शेतात सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिबट्या अचानक दिसल्याने मळे विभागात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमधे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पळसे गावच्या शिवारातील बाळासाहेब सरोदे यांच्या शेतात काल बिबट्याचे दर्शन झाले, मात्र आता बिबट्या नागरिकांना सायंकाळीदेखील दिसू लागल्याने माणसानां सहा वाजेनंतर घराबाहेर पडणे धोकादायक वाटत असून, बिबट्या आता दिवसादेखील या भागात अनेकांना दिसत आहे.
शालेय विद्यार्थी व शेतकरी वर्ग, मोलमजुरी करणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पळसे शिवारात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब सरोदे व अशोक गायधनी यांच्यासह नागरिकांनी वनविभागाकडे
केली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी पळसे, कोटमगाव, जाखोरी आदी ठिकाणी दोन बिबट्यांचे नागरिकांना दुपारीच मागील आठवड्यात दर्शन झाले होते. काल पळसेला पुन्हा बिबट्या त्याच जागेवर दिसून आल्याने आता तर दिवसाढवळ्या घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.बिबट्याचे अस्तित्व असणार्‍या ठिकाणी वनविभागाचे मंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक अधिकारी विजयसिंह पाटील, वनरक्षक अधिकारी पांडुरंग भांगरे यांनी शेतातील ठिकाणाची पाहणी करून तातडीने वनविभागाने एक पिंजरा लावावा, अशी मागणी केली. तर नासाका शिवारात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने बिबट्याचा वावर आजूबाजूच्या उसाच्या शेतात असावा, असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत.
गावातील शिवारात सध्या बिबट्याचा वावर वाढला असल्याने शालेय विद्यार्थी, शेतमजूर, शेतकरी, प्रवासी वर्ग तसेच शेतावर जाणार्‍या महिला भगिनींत बिबट्याची दहशत पसरली असून, सतत दिसणार्‍या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंच भाऊसाहेब गायधनी, माजी सरपंच अजित गायधनी, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब सरोदे, माजी सरपंच प्रिया गायधनी, संदीप गायधनी, विजय सरोदे, शरद गायधनी, अशोक गायधनी आदींनी
केली आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago