सकाळी 8 वाजताच गंगापूर कॅनॉलवर फेरी
पंचवटी : वार्ताहर
शहर परिसरालगतच्या बिबट्यांचा वावर आता नागरी वस्तीत वाढू लागला आहे. शुक्रवारी (दि. 4) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगापूर कॅनॉलवर फडोळ मळ्याजवळ बिबट्या फेरी मारताना दिसल्यावर नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
दोन-तीन दिवसांपूर्वी बिबट्याने रामवाडी पुलाजवळील बेलेश्वर महादेव मंदिराच्या भागात दर्शन दिले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी मेरी परिसराच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे समजले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगापूर कॅनॉलवरून फडोळ मळ्याजवळ अगदी डामडौलात चालताना दिसला. गंगापूर कॅनॉलवर सकाळी पायी फिरणार्यांची संख्या मोठी असते. तसेच या परिसरात फडोळ मळ्याची वस्ती आहे.
याच रस्त्यावरून गंगापूर रोडकडे शाळा, महाविद्यालय असल्याने पालक आपल्या मुलांना सोडायला जात असतात. त्यातच बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांचे धाबे दणाणले होते.
गंगापूर कॅनॉलच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. याच भागात, तसेच डुकरांचासुद्धा सुळसुळाट वाढला असल्याने शेतीचे नुकसान होत आहे.
फडोळ वस्तीतील अनेक विद्यार्थी शाळेत येत-जात असतात. त्यातच बिबट्याने अशा प्रकारे सकाळीच दर्शन दिल्याने परिसरातील शेतकरी, फिरणारे नागरिक भयभीत झाले आहेत. फडोळ वस्तीवरील शेतकर्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी
केली आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…