संपादकीय

वादाशिवाय साहित्य संमेलन व्हावे!

नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान सातारा येथे मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक ’पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, साहित्यरत्नांचे स्वागत करायला सातारानगरी सज्ज झाली आहे. या संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. सातारा हे केवळ ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर साहित्य आणि कला यांचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेले हे शहर मराठी साहित्याच्या या महाकुंभाचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले शिवेंद्रराजे भोसले या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हेदेखील या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. हे साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा व मावळा फाउंंडेशन यांच्यामार्फत आयोजित केले जात आहे. या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांसोबत साहित्य रसिकही या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांतून मराठी साहित्य रसिक या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील असा विश्वास आयोजकांना आहे.
सातार्‍यात होणारे हे साहित्य संमेलन मराठी साहित्य रसिकांना पर्वणीच ठरणार आहे. यावेळच्या साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात रसिक भेट देतील यात शंका नाही. त्यामुळेच सातार्‍यात होणारे हे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चा तसेच भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या भाषणाकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अनेक ठराव करण्यात येणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने या साहित्य संमेलनाचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच हे साहित्य संमेलन कोणत्याही वादाशिवाय पार पडेल अशी अपेक्षा साहित्य रसिक व्यक्त करीत आहेत. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून बनले आहे. हे समीकरण यावेळी तरी बदलावे. या साहित्य संमेलनाला कोणत्याही वादाचे गालबोट लागू नये, अशी अपेक्षा साहित्यरसिक व्यक्त करीत आहेत. अजून तरी या साहित्य संमेलनाविषयी कोणताही वाद उत्पन्न झाला नाही, ही आनंदाची बाब आहे. असेच वादाविना साहित्य संमेलन पार पडावे.
साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांचा मेळा. वारकरी ज्याप्रमाणे पंढरपूरची वारी न चुकता करतात त्याप्रमाणे साहित्यिकही न चुकता संमेलनाला हजेरी लावतात. साहित्यरसिकही साहित्यिकांचे मत, विचार, चर्चा ऐकण्यासाठी आतुर असतात, पण दरवेळी नको त्या विषयावर वाद होतो आणि त्या वादाच्या छायेतच साहित्य संमेलन पार पडते. त्यामुळे साहित्य संमेलनाचा मूळ उद्देशच भरकटतो. माध्यमातदेखील त्या वादावरच चर्चा होते. त्यामुळे साहित्य रसिकांचा मोहभंग होतो. त्यामुळे वादाशिवाय साहित्य संमेलन पार पडेल याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. याशिवाय संमेलन आणखी लोकप्रिय होऊन तरुणाई या साहित्य संमेलनाकडे कशी आकर्षित होईल याचाही विचार आयोजकांनी करावा. आजचे तरुण सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करतात. तरुणवर्गाला साहित्य संमेलनात आकर्षित करायचे असेल तर आयोजकांनी साहित्य संमेलनाला समाजमाध्यमांशी जोडावे. आयोजकांनी साहित्य संमेलनाचे सर्व अपडेट फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांवर द्यावीत म्हणजे तरुणाईतदेखील साहित्य संमेलन लोकप्रिय होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातार्‍यात होत असलेले हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकप्रिय होऊन कोणत्याही वादाशिवाय पार पडेल, ही अपेक्षा. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा!

Let’s have a literary conference without controversy!

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago