लाईफस्टाइल

आनंदाचे शिंपण करूया!

आनंद आपल्याला कशातही मिळवता येतो, फक्त तो घेण्याची आपली मानसिकता असायला हवी. काल-परवाच एक कविता वाचण्यात आली. मी कागदावर कविता लिहिली. नातवाने त्या कागदाची होडी बनवून पाण्यात सोडली. तसं म्हटलं तर कवीची कविता पाण्यात गेली, पण त्यांना आपल्या नातवाच्या कल्पनेचे कौतुक वाटलं. म्हणजेच काय तर सकारात्मकता. त्यांनी त्याच्यात आनंद शोधला. असंच आपण करत राहिल्यास आपल्याला आनंद पसरवता येईल व स्ट्रेस नाहीसा होईल.

आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद व्यक्त करता येऊ शकतो. संगीत ऐकणे, फावल्या वेळेत आपले आवडते छंद जोपासणे. जसं की, चित्रकला, पेटी, तबलावादन एम्ब्रॉयडरी, जरदोसी व आपण खेळातूनही आपला आनंद चिरकाल टिकू शकतो. फावल्या वेळेत घरातल्या घरात कॅरम, बुद्धिबळ खेळणे, वाचन करणे आणि यापैकी नाही जमलं तर पर्यटन हा सर्वांत महत्त्वाचा आणि आनंद देणारा असा छंद आहे. नाही का?
त्यामुळे आपल्याला ज्या-ज्या ठिकाणी आनंद मिळवता येईल तो आपण घेणे गरजेचे आहे व आनंद देता येईल तसे आपण वागणे गरजेचे आहे. मनाला खूप त्रास करून घेणे नाही.
काही लोक खूप खवय्ये असतात. ते खाण्यासाठी जंग जंग पछडतात. त्यांना प्रत्येक ठिकाणची खाऊगल्ली माहीत असते. आणि ते स्वतः खातात व इतरांनाही खाऊ घालण्यात आनंद मानतात.
एखाद्या कौतुक सोहळ्यातूनही लवकर बाहेर पडता यायला हवं. म्हणजे लगेच दुसरा मार्ग सापडतो. त्यात मध्ये खितपत पडत नाहीत व यश हे सीमित राहत नाही.
पूर्वीच्या काळी लोक आनंदाचं किती छानपैकी शिंपण करत होते आणि हे समजायला आपल्यालाही खेड्यात जावं लागेल. कारण त्यावेळी महागाई खूप होती असं म्हणता येणार नाही; परंतु काटकसर मात्र खूप होती, हे जास्त संयुक्तिक वाटतं. कारण खेड्यातील लोक पैसा सांभाळून होते. त्यांना व्याजाचा पैसा म्हणजे विष वाटायचं. आज तोच पैसा म्हणजे हौस आहे.
आमच्याकडे ज्वारी, बाजरीचे तोटे यायचे. तोटा सोलून त्याच्या चिटोर्‍याच्या आम्ही बैलगाडी, शिडी, मोर असे खेळायचो. साहित्य बनवायचो. आनंद होता तो. साधं पाटावरती चौपट काढून खेळायचो. चिंचोक्या, लंगडीपळी, सागरगोट्या तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल कचर्‍यातले प्लास्टिक जाळून आम्ही चेंडू बनवायचो. आणि क्रिकेट खेळायचो. पण आजच्या मुलांना सर्वच आयतं हवं. अजिबात स्ट्रगल नको आहे आणि त्यामुळे त्यांची मानसिकता ही फक्त आपल्यापुरतीच मर्यादित आहे. त्यांना फक्त स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठीच ते प्रयत्न करतात आणि आनंद मात्र विसरून जातात. जर मित्रांनो, आपल्याला स्ट्रेस कमी करायचं असेल तर आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवला पाहिजे. पैसा हे साधन आहे; साध्य नाही हेदेखील ओळखलं पाहिजे. पूर्वी एकवेळ खाण्याची पंचायत होती तरी आत्महत्या म्हणा, दुजाभाव म्हणा, भांडण म्हणा फार कमी प्रमाणात आणि भांडण झालेच तर अगदी एकमेकांच्या कुळाचा उद्धार व्हायचा आणि पुन्हा तेच कुटुंब, तेच शेजारी पुन्हा दोन-चार दिवसांत एकत्रित येत. हेच खरं माणुसकीचे लक्षण होय. आजच्या काळात असे कुणाशी भांडण झाले, वाद झाले तर पूर्णपणे संवाद खुंटला जातो. पुन्हा त्या व्यक्तीशी संवाद दुरापास्त असतो.
एकवेळेला मोडेन, पण वाकणार नाही अशी काही परिस्थिती निर्माण होते. हे टाळायला हवं. आज आहे तर आनंद वाटून घ्या. म्हणून…
मी नसताना कोण तुझे शब्द झेलेल
आहे जोपर्यंत जीवन, आनंदात जगून घेणे..!

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

8 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

9 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

9 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

9 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

9 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

9 hours ago