नाशिक

चितेगाव शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

आधुनिक बचाव पथक, एआरइएएस फाउंडेशन, वनराजा पथकाची मोहीम

ओझर : वार्ताहर
निफाड तालुक्यातील चितेगाव येथे कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास नाशिक पूर्व वनविभागाचे आधुनिक बचाव पथक निफाड व एआरइएएस फाउंडेशन संस्था तसेच निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्थेच्या मदतीने सुरक्षितरीत्या बचावकार्य करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.21) रात्री आठच्या सुमारास चितेगाव येथील सुभाष साहेबराव गाडे यांच्या घराजवळील विहिरीजवळ बिबट्या कुत्र्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला होता. कुत्रा स्वतःचा जीव वाचवत पळाला व त्याचा पाठलाग करत असताना कुत्रा व बिबट्या दोन्ही विहिरीत पडले. ही गोष्ट सुभाष गाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीसपाटील राहुल दळवी व सरपंच सुभाष गाडे यांना कळवले, तसेच एआरइएएस फाउंडेशनचे संचालक, वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे यांना फोनवरून माहिती दिली.
नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे, येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परिक्षेत्राचे आधुनिक बचाव पथक व एआरईएएस फाउंडेशनचे सदस्य व निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला. तत्पूर्वी बिबट्याने विहिरीत मोटारच्या पाइपचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. विहिरीत सोडलेल्या पिंजर्‍यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याला निफाड वनोद्यानात नेण्यात आले. बचावकार्यानंतर नागरिकांचे प्रबोधन केले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल जयराम शिरसाठ, वनरक्षक विजय दोंदे, आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माळी, विजय माळी, शरद चांदोरे, सागर दुशिंग, सादिक शेख, वैभव दौंड, रितेश निहारे, मयूर गांगुर्डे, ज्ञानेश्वर पवार, काशीनाथ माळी आणि एआरईएएस फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे, सुशांत रणशूर, हेमंत वानले, मोहन जगताप, पवन नागपुरे, मंगेश चारोस्कर, करण पवार, योगेश शेजवळ, राजेश शेजवळ, निर्भय संचार फाउंडेशनचे शरद जाधव, शंभू जाधव, नीलेश उल्लारे यांनी बचावकार्य केले. सरपंच सुभाष गाडे, ग्रामविकास अधिकारी विजया वायकर, तलाठी शेखर पाटील, पोलीसपाटील राहुल दळवी व ग्रामस्थांंचे
सहकार्य लाभले.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago