नाशिक

मौल्यवान गणपती मंडळांची यादी जाहीर

नाशिक ः प्रतिनिधी
गणेशोत्सवाला सुरुवातझाली असून, शहरातील विविध गणपती मंडळांची नावे व त्यांची मौल्यवान मूर्ती, दागदागिने व सजावटींची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शहरातील पारंपरिक व प्रसिद्ध मंडळांचा यात समावेश आहे. मौल्यवान गणपती मंडळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख चौक, गल्लीबोळ व सांस्कृतिक केंद्रांमधील या मंडळांनी यंदाही देखावे, रोषणाई व सामाजिक संदेशांनी भरलेली सजावट उभारण्यात येत आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाकडून मंडळांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मौल्यवान गणपती मंडळांकडे भक्तांचे आकर्षण असेल. गणेशभक्तांनी सुरक्षिततेची काळजी घेत या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मौल्यवान गणपती मंडळे अशी ः

सरदार चौक मित्रमंडळ, पंचवटी- 35 किलो चांदीचे दागिने
शक्तीनगर मित्रमंडळ (एसएफसी फाउंंडेशन)- 6 किलो चांदीची मूर्ती.
नवजीवन कला-क्रीडा मंडळ, पंचवटी- 700 ग्रॅम चांदीची मूर्ती
नवनिर्माण कला व क्रीडा मंडळ, हेमकुंज परिसर, पंचवटी- 11 किलो चांदीची मूर्ती
सूर्यप्रकाश नवप्रकाश क्रीडा मंडळ- 11 किलो चांदीची मूर्ती
तीळभांडेश्वर लेन मित्रमंडळ- 11 चांदीची मूर्ती
पगडबंद लेन मित्रमंडळ- 51 किलो चांदीची मूर्ती, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने
अशोक स्तंभ मित्रमंडळ- 21 किलो चांदीची मूर्ती
मानाचा राजा, अशोक स्तंभ मित्रमंडळ- 7 किलो चांदी
रविवार कारंजा मित्रमंडळ- 151 किलो चांदीची मूर्ती, 1.25 ग्रॅम चांदीचे दागिने
नवक्रांती मित्रमंडळ- 34 किलो चांदीची मूर्ती, 48 किलो सिंहासन
बजरंग मित्रमंडळ, सातपूर- 2.5 किलो चांदीची मूर्ती
एकता विविध विकास सेवा संस्था, राजरत्ननगर, सिडको- पाच किलो चांदीची गणेेशमूर्ती
श्रीकृष्ण कला, क्रीडा मंडळ, श्रीकृष्णनगर, अंबड- 11 चांदीची मूर्ती
इच्छापूर्ती गणेश मंडळ, गांधीनगर- 5.5 किलो चांदीची मूर्ती
ईगल स्पोर्ट क्लब, अनुराधा टॉकीजमागे- 21 किलो चांदीची मूर्ती
सौभाग्य मित्रमंडळ, सौभाग्यनगर, लॅम रोड- 5.36 ग्रॅम चांदीची मूर्ती व 1 ग्रॅम सोन्याचे अलंकार
विजय अमरदीप मंडळ, देवळाली कॅम्प- 11 किलो चांदीची मूर्ती
अभिनव मित्रमंडळ, भगूर- 6.5 किलो चांदीची मूर्ती
हनुमान मित्रमंडळ, भगूर- 1.140 ग्रॅम चांदीची मूर्ती
वंदे मातरम् मंडळ, शिवाजी चौक, भगूर- 8.25 तोळे सोन्याची मूर्ती
तरुण उत्सव मंडळ, भगूर- 7 किलो चांदीचे अलंकार
इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्ट, गुरुद्वारा रोड, देवळाली कॅम्प- 2 किलो चांदीची मूर्ती

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago