नाशिक

मोबाईल हॅक करून परस्पर घेतले 4.94 लाखांचे कर्ज

एक लाख रुपये परस्पर हस्तांतरित

सिडको : विशेष प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारीतून मोबाईल हॅक करून खातेधारकाच्या परवानगीशिवाय बँक कर्ज काढून, त्यातून एक लाख रुपये परस्पर इतर खात्यात वर्ग करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश विठ्ठल येवले (वय 49, रा. आम्रपाली लॉन्समागे, कामटवाडे, सिडको, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 19 जून 2025 रोजी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये घुसखोरी करून अज्ञाताने मोबाईल हॅक केला. त्यातून त्यांचे वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स मिळवून त्यांच्या नावावर एचडीएफसी बँक सातपूर शाखेतून एकूण चार लाख 94 हजार 756 रुपये खाजगी कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर त्या कर्जातील 50 हजार रुपये अदनान हुसेन आणि 50 हजार रुपये अकिब इस्राईल यांच्या खात्यात दि. 19 जून 2025 रोजी परस्पर वर्ग करण्यात आले. फिर्यादीला यासंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची परवानगी न घेता ही रक्कम त्यांच्या खात्यातून काढली गेली. त्यामुळे त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खैरनार तपास करत आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

1 hour ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

1 hour ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

2 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

2 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

2 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

2 hours ago