महाराष्ट्र

कर्जमाफीची रक्कम 30 जुलैपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात : कृषिमंत्री

मुंबई : प्रतिनिधी
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची पहिली यादी बुधवारी (22 जुलै) जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, या योजनेंतर्गत मिळणारी कर्जमाफीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत येत्या 30 जुलैपूर्वी थेट पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील शेतकर्‍यांसाठी ही दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे.
राज्य शासनाने यापूर्वी ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला. या विलंबाबाबत स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, झालेला विलंब हा शेतकर्‍यांच्या हितासाठीच असून, ही कर्जमाफी केवळ आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आणि गरजू गरीब शेतकर्‍यांसाठीच लागू करण्यात आली आहे. निकषांमधील या सुस्पष्टतेमुळे खर्‍या लाभार्थ्यांपर्यंतच शासनाची मदत पोहोचणार आहे. या योजनेचा लाभ देताना एक प्रमुख निकष निश्चित करण्यात आला असून, प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरणारे मोठे शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहेत. या प्राप्तिकराच्या निकषाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Loan waiver amount to be credited to farmers’ accounts before July 30: Agriculture Minister

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago