महा कृषिसंकल्प !
नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान
मुंबई : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांना काल (दि. 6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठा दिलासा दिला. सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या शेतकर्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा महत्त्वांंकाक्षी निर्णय घेतला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. याशिवाय मेट्रोचे जाळे विस्तारण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली. चौथी मुंबई वसविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूक काळात राज्यातील शेतकर्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठित केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकीत असलेल्या शेतकर्यांना दोन लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना पन्नास हजारांंपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून, समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कोणते शेतकरी पात्र ठरणार?
♦ दोन लाखांंपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी.
♦ ज्यांचे पीककर्ज थकलेले आहे असे शेतकरीच पात्र असतील.
♦ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.
♦ नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
फडणवीस यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना पुढील आर्थिक वर्षातही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावर विरोधकांनी लगेच महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे अनुदान 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याच्या दिलेल्या आश्वासनाबद्दल विचारले. यावर फडणवीस यांनी म्हटले की, काळजी करू नका. तुमच्या मनातील गोष्टी आम्हीच पूर्ण करणार. वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. फक्त कोर्टात जाऊ नका, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात सध्याच्या घडीला 37 लाख लखपती दीदी आहेत. आणखी 25 लाख बहिणींना लखपती करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Loan waiver up to Rs 2 lakh for farmers
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…