नाशिक

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद, ओझर विमानतळाचाही होणार विस्तार

नाशिकचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याने त्यांच्या विकासासाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसराचा पर्यटन व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे.
याशिवाय नाशिकमधील महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नाशिक विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच नाशिकची पुणे आणि मुंबईशी जोडणार्‍या महामार्गांच्या सहापदरीकरणावरही भर देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.

गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणार

एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्याने जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी अजितदादांच्या पश्चात अर्थसंकल्प सादर केला. काँक्रीट रस्त्यांसह मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.

पुणे शहराला काय मिळाले?
1) पुणे-लोणावळा तिसर्‍या व चौथा रेल्वे मार्गिकेच्या पाच हजार 100 कोटींंचा प्रकल्पास मान्यता 2) मेट्रो टप्पा दोनला मान्यता 3) रामवाडी ते वाघोली 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पालादेखील मान्यता.

मुंबईसाठी महत्त्वाच्या घोषणा
♦ अजून एक भुयारी मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया.
♦ अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार.
♦ राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार
♦ सहा हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार.
♦ 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार.
♦ दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार.
♦ वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार.
♦ पनवेल ते कर्जत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार.

Substantial provision for Nashik Simhastha Kumbh Mela, Ozar Airport will also be expanded

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago