समूहिक प्रयत्नांतून साहित्य संमेलन यशस्वी – छगन भुजबळ
नाशिक,
लोकप्रिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नाशिक महानगपालिका आणि समस्त नाशिककरांचा हातभार लागल्याने नाशिकमध्ये पार पाडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे. पुन्हा जर साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी नियोजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याबद्दल भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून छगन भुजबळ यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य संमेलनात नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांमुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी नाशिकच्या जनतेचे आभार मानावे तितकेच कमी असल्याचे सांगत पुन्हा नाशिकला संमेलन होणार असल्यास नाशिककरांच्या वतीने स्वागतच असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, डॉ.प्रशांत पाटील, भगवान हिरे, प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, फणिंद्र मंडलिक, चंद्रकांत दिक्षित, मुक्ता बालिका, अपूर्वा सौचे, सागर पाटील, आदित्य समेळ, विक्रम सोनवणे, तेजस कुलकर्णी, अमोल जोशी, अजिंक्य कुलकर्णी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दिंडोरी: प्रतिनिधी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे दाक्षिणात्य सिनेमा स्टाईल शेजाऱ्याची पिता…
सहायक पोलिस निरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याने गुन्हा नाशिक: प्रतिनिधी गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात…
मनमाड रेल्वे स्थानक हरवले...? मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच…
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…