आस्वाद

आईचे दूध बाळासाठी अमृतच

आईचे दूध बाळासाठी अमृतच

डॉ, प्रणिता अशोक

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे आईचे पिवळे दूध ज्याला चिक किंवा ‘कोलेस्ट्रम’ असे म्हणतात, हे नवजात शिशूसाठी अतिशय पोषक असून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे कार्य करते. त्यासाठी बाळंतपण झाल्याबरोबर नवजात शिशूला आईचे दूध पाजले गेले पाहिजे. आईचे दूध हे बाळाच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.
आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असतात. सर्वसाधारण अवस्थेपेक्षा पोषणाच्या दृष्टीने स्तन्यदा मातेला वेगळे मानले जाते. कारण बाळाचे योग्य पोषण मिळून मातेचे कुपोषण टाळणे व बाळंतपणाच्या वेळी मातेच्या शरीराची झालेली झीज भरून काढणे गरजेचे असते

• बाळाला चांगल्या दर्जाचे व योग्य त्या प्रमाणात स्तनपान करण्यासाठी आईने स्वतच्या आहारावर भर देणे गरजेचे आहे. कारण जर मातेचे जेवण हे पोषकदृष्टय़ा योग्य असेल तरच आईचे व बाळाचे स्वास्थ्य चांगले राहू शकते.

स्तनपान देणाऱ्या मातांनी खालील गोष्टी आर्वजून कराव्यात

• दिवसभरातून पाच ते सहा वेळेस थोडे थोडे खावे.म्हणजे पचनास सोपे जाते

• आहारात दूध, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, अंडी, सर्व प्रकारची धान्ये जसे नागली, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यांचा आर्वजून समावेश करावा.

• दिवसभरात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे (तीन लिटर) तसेच ताज्या फळांचे सेवन करावे.

• सकाळच्या व दुपारच्या न्याहारीत पौष्टिक पदार्थ खावेत. जसे राजगिरा खीर, नाचणी चे पदार्थ , कडधान्याची उसळ, डिंकाचे लाडू, आळीव लाडू (खोबरे टाकून), आळीव खीर, अशा पदार्थामुळे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच दुधाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

• आयोडिनयुक्त मिठाचा वापर करावा.

• लोहयुक्त पदार्थाचा वापर करावा उदा जसे हिरव्या पालेभाज्या, आळीव, खजूर, अंजीर, मनुके, बीट, गूळ, शेंगदाणे जेणेकरून शरीरातील कमी झालेले रक्त भरून काढण्यास मदत होईल. लोहयुक्त पदार्थ खात असतांना जीवनसत्त्व ‘क’ घेणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी लिंबू, टोमॅटो, संत्री, मोसंबी, मनुके आदींचा वापर करा

• आहारात डांगर, गाजर, पपई, आंबा, पेरू, अननस यांचा समावेश करावा तसेच पौष्टिक चटण्या जसे तिळाची, जवस, खुरसणी तसेच कोशिंबिरीचा वापर करावा.

स्तनपान देणाऱ्या मातांनी खालील गोष्टी टाळाव्यात

• अधिक तिखट व वारंवार तळलेले पदार्थ खाऊ नये. चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन करू नये.

• तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करू नये.

• बाहेरील उघडय़ावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत.

  1. • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणGतीही औषधे घेऊ नयेत.
    • तसेच या सर्व काळात आई व बाळ आनंदी ठेवण्याची जबाबदारी मात्र सगळ्यांनी मिळून घ्यावी हे ही तितकेच गरजेचे आहे
    कारण आंनदी मन हे निरोगी शरीर ठेवण्यास नेहमीच मदत करते

वरील गोष्टी योग्यरीत्या स्तनदा मातांनी अमलात आणल्या तर नक्कीच माता आपल्या शिशूंना चांगल्या प्रकारे स्तनपान करू शकतील. आपल्या देशाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

आधार : World health organisation (WHO)guidelines

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago