नाशिक

मालेगाव शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा

रमजानमध्ये नागरिकांची गैरसोय, व्यावसायिकही अडचणीत

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन नोंदणी करूनही सिलिंडर मिळण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गॅस एजन्सींसमोर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
सध्या रमजान महिन्यात मुस्लिम समाजाचे रोजे (उपवास) सुरू असल्याने ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. पहाटेच्या सहरी व सायंकाळच्या इफ्तारसाठी स्वयंपाकाची मोठी तयारी करावी लागत असताना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरातील तापमान वाढल्याने भरउन्हात नागरिकांना गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने रोजेदारांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील भारत, एचपी व इंडेन गॅस कंपन्यांच्या ग्राहकांना सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत होत असल्याचे सांगितले. घरगुती सिलिंडरबरोबरच कमर्शिअल गॅस सिलिंडरचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, खानावळ व फास्टफूड व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर कमर्शिअल सिलिंडर मिळत नसल्याने काही व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, काही ठिकाणी कोळशाच्या भट्ट्यांवर स्वयंपाक सुरू केल्याचेही दिसून येत आहे.
मालेगाव कॅम्प, डी. के. कॉर्नर, संगमेश्वर, सटाणा नाका तसेच पूर्व भागातील किदवाई परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे या भागातील व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील सुमारे 460 कॅन्टीन व हॉटेल व्यावसायिकांना या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता असून, गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील काही दिवसांत अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

‘सिलिंडर उपलब्ध नाही’

शहरात घरगुती गॅसचे ऑनलाइन बुकिंग काही काळासाठी बंद झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिलिंडर मिळत नसल्याने नागरिक थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात धाव घेत असून, एजन्सीसमोर मोठी गर्दी होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून टंचाई वाढल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध सिलिंडर खरेदी केले. मात्र, सध्या काही एजन्सींकडे सिलिंडरच शिल्लक नसल्याने ‘सिलिंडर उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले आहेत.

LPG gas shortage in Malegaon city

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago