बिटकोजवळ डॉक्टरवर वार करुन लुटले

नाशिकमध्ये चाललेय तरी काय?
नाशिकरोड : उद्योजकाची हत्या, क्रिकेट खेळणार्‍या युवकावर तलवारीने वार या घटना ताज्या असतानाच काल सायंकाळच्या सुमारास नवीन बिटको रुग्णालयाजवळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरवर तलवारीने वार करुन त्याच्याजवळील रोकड तसेच मोबाइल घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी पोबारा केल्याची घटना घडली. डॉ. ओंकार पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन आले होते. शहरात एकामागोमाग एक सुरू असलेल्या घटनांमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *