नाशिक

देवमामलेदार यात्रोत्सवानिमित्त सटाण्यात आज महापूजा

सटाणा : तालुका प्रतिनिधी
येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवानिमित्त सोमवारी (दि. 15) मंदिरात पहाटे महापूजा, दुपारी रथ मिरवणूक, तसेच विविध कार्यक्रम होणार आहेत. भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सोमवारी पहाटे चारला बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे व प्रतिभा चावडे, सनपा प्रशासक तथा मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व स्वप्नील पाटील, तसेच देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड आदींच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात महापूजा आयोजित केली आहे. दुपारी तीनला पोलीस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस निरीक्षक योगेश पाटील आदींसह पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
पंधरा दिवसांच्या कालावधीत यात्रोत्सवात अन्नदान, कुस्ती दंगल, दहीकाला व कीर्तन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यशवंत लीलामृत पारायण सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यात्रोत्सवात पाळणे, हॉटेलसह विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago