नाशिक

केजीएसच्या पहिल्या गाळप हंगामास प्रारंभ

चेअरमन होळकरांच्या हस्ते पूजन; यंदा 4 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

लासलगाव : वार्ताहर
निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील के. जी. एस. शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड (युनिट ऑफ ग्रेनाँच इंडस्ट्रीज लि.) या साखर कारखान्याच्या 2025-26 या वर्षातील पहिल्या गाळप हंगामाचा शानदार आणि उत्साहपूर्ण शुभारंभ रविवारी करण्यात आला.लासलगावचे कृषी उद्योजक संजय चांगदेवराव होळकर यांच्या ग्रेनाँच इंडस्ट्रीज समूहाने ऑक्टोबर 2025 मध्ये हा कारखाना एनसीएलटीमार्फत विकत घेतला. गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ कारखान्याचे बंद असलेले कामकाज पुन्हा सुरू केले आहे.
या सोहळ्याची सुरुवात रविवारी (दि. 14) सकाळी दहाला कारखान्याचे चेअरमन संजय होळकर आणि वैशाली होळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाली. यावेळी श्रीसत्यनारायण पूजन आणि काटापूजन करण्यात आले.
नाफेडचे माजी संचालक व अध्यक्ष चांगदेवराव होळकर, चेअरमन संजय होळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत उसाची पहिली मोळी टाकून औपचारिक गाळप सुरू करण्यात आले. उसाच्या पहिल्या गाडीला झेंडा दाखवून, श्रीफळ वाढवून नवीन हंगामाची औपचारिक सुरुवात केली. कारखान्याने यंदा सुमारे चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने कारखान्याची यंत्रणा सज्ज आहे.
चेअरमन संजय होळकर म्हणाले की, ऊस हे एकमेव हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकर्‍यांच्या कारखान्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. शेतकर्‍यांचे हित जपत, नवीन व्यवस्थापनाने मागील व्यवस्थापनाच्या काळात थकीत असलेल्या 776 ऊस उत्पादक शेतकर्‍यांची सुमारे 6.5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम तीन टप्प्यांमध्ये अदा केली. त्यामुळे केवळ बुडीत रक्कमच नव्हे, तर ऊस वाहतूक आणि इतर देणीदेखील पूर्ण झाली. यावेळी त्यांनी चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या सोहळ्याला नाफेडचे माजी संचालक व अध्यक्ष चांगदेवराव होळकर, चेअरमन संजय होळकर, संचालिका वैशाली होळकर, सोनिया होळकर, संचालक सत्यजित होळकर, प्रकाश दायमा, कार्यकारी संचालक आदित्य होळकर यांच्यासह मंडळाचे सदस्य, जनरल मॅनेजर सुखदेव शेटे, जनरल मॅनेजर घोरपडे, वसंत शिंदे, शेतकी अधिकारी पटेल, देसले, डॉ. वसंत शिंदे, निरंजन होळकर तसेच कार्यकारी संचालक, खातेप्रमुख आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या गाळप हंगाम शुभारंभाने परिसरातील शेतकरी, कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago