नाशिक एकेकाळी हिंदूहदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळ्खला जायचा. त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव शहरासह जिल्हयाच्या राजकारणावर होता. परंतु सेनेचा एकेकाळीचा हा बालेकिला भाजपचा झाला आहे. केद्रात आणि राज्यातील सत्तेमुळे नाशकातील शहर भाजपाला 2017 साली झालेल्या निवडणुकीत फायदा होत एकहाती सत्त्ता या पक्षाने मिळ्वली. विशेषत: शहरातील विधानसभेच्या तीन्ही जागांवर भाजप आमदार दुसऱ्यांदा निवडून गेलेत. मात्र आगामी महापालिकेची निवडणूक भाजपसाठी सोपी राहणार नाही. पालिकेत महाविकास आघाडी होण्याचे संकते आहे. त्यामुळे ही आघाडी झाल्यास भाजप व शिंदेच्या सेनेसमोर तगडे आव्हान असणार आहे.
………………..
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख केद्र असल्याने आगामी निवडनुकीत भाजपाला पालिकेत पुन्हा सत्त्ता हवी आहे. ना. गिरीश महानज यानी मिशन नाशिक महापालिका ठरवूनही टाकले आहे. काही महिन्यापूर्वी नाशकातच भाजपचे तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन झाले. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पासून ते अनेक मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची अधिवेशनाला उपस्थिती होती. यावेळी नाशिक पालिकेत सत्त्ता मिळवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. यापूर्वी एकला चलो रे चा नारे देणारे नाशकातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आता महाविकास आघाडी करुन निवडणूक लढवायला हवी. असे म्हणत आहेत. तसेच मध्यंतरी खा. संजय राउत यांनीही आगामी महापालिका निवडनुका महाविकास आघाडी करुनच लढवल्या जाणार असल्याचे म्हटले होते. दरम्याज 2019 साली महाविकास आघाडी त्याच्यानंतर सर्वात जास्त फटका ठाकरे यांना बसलाय. तेरा खासदार, चाळीस आमदार, शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. यात नाशिक शहर जिल्हयातील आमदार, माजी नगरसेवकांचाही सहभाग होता. महापालिकेत सत्ता नसली तरी ठाकरे यांच्या सेनेचा प्रभाव व दबदबा नाशिक महापालिकेत होता. गेल्या निवडणुकीत 35 नगरसेवक महापालिकेत निवडून गेले होते. त्यामुळेच आगामी महापालिकेत ठाकरे गटाला पूर्वीप्रमाणेच त्यांचा दबदबा कायम ठेवायचा आहे. यासठी जास्तीत जास्त सदस्य संख्या निवडणून आणन्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या मदतीने पालिकेवर सत्त्ता स्थापन करण्याचे स्वप्न ठाकरे गटाचे पदाधिकारी पाहत आहेत. ठाकरे यांना जनसामन्यांची सहानभूती आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले काम लोकांना भावल्याचा दावा पदाधिकरी करत आहेत. तर शहरात ठाकरे गटाच्या तुलनेने राष्ट्रवादी व कॉग्रेसची ताकद कमी असली तरी महाविकास आघाडी झाल्यास भाजपविरोधात आणि शिंदेंच्या सेनेसमोर मोठे आव्हान राहील. हे नाकरता येत नाही. महाविकास आघाडी सरकारने नाशिक महापालिकेच्या 122 जागा वाढून त्या 133 केल्या. परंतु गेल्या वर्षी राजकीय उलथापालथ होउन सत्तेत आलेल्या शिंदे-भाजप सरकारने तीन सदस्य प्रभागावर आक्षेप घेत तो निर्णय रद्द करत पुन्हा चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून अंतिम निर्णय येणे बाकी आहे.
.
भाजप शहराध्यक्ष पदावरुन असंतोष ?
भाजपातील शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असून या पदावर वणी लागावी यासाठी पक्षातील काही दिग्गजांनी वरिष्ठांकडे सेटींग लावल्याची जोरदार चर्चा भाजपातील कार्यकर्त्यात आहे. गिरीश पालवे यांचा कार्यकाल संपला असून त्यांच्यानंतर माजी आमदार बाळासाहेब सापन, माजी स्थायी सभापती गणेश गिते, ॲड राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा आहे. महापालिका पुढच्या काही महिन्यांवर असतांना भाजपात अंतर्गत असंतोष वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदाला भाजपच्या वरिष्ठाना कधी मुहूर्त मिळ्णार असा सवालही भाजपातील कार्यकर्त्ये खासगीत करत आहे.
……..
शिंदेंच्या सेनेला भाजप सोबत घेणार का
नाशिक महापालिकेत पंधरा माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या सेनेला भाजप समवेत युती हवी आहे. भाजप पालिका निवडनुकीत शिंदे गटाला सोबत घेणार का, जर घेतलेच त्यांना किती जागा सोडेल, हे निवडणुकी पूर्वी स्पष्ट होइल.
….
महापालिका निवडणुका ऑक्टोंबर मध्ये
ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्यावरुन महापालिका निवडनुकांचा मुद्दा न्यायालयता प्रलंबित आहे. मे महिन्यात यावर निकाल येउ शकतो. उन्हाळी सुट्टी होण्यापूर्वी महानगरपालिकांचा निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना व इतर प्रक्रिया पार पाडून ऑक्टोंबर महिन्यात राज्यातील महापालिका निवडनुका होउ शकतात. असे भाकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे.