रुग्णांची संख्या 1,010 वर, तर दहा जणांचा मृत्यू
मुंबई ः देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरुवात केली असून, सोमवारी (दि. 26) देशात 1,010 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक 430 रुग्ण केरळमध्ये सापडले. त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये 210 आणि दिल्लीत 104 रुग्णांची भर पडली. देशभरात एकूण दहा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरिएंटचा शोध लागला असून, त्यांपैकी जेएन-1 या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या व्हेरिएंट्सचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जात आहे. सोमवारी ठाण्यातील कळव्यामध्ये एका 21 वर्षांच्या युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या युवकावर 22 मेपासून उपचार सुरू होते. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात एकूण दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जेएन-1 व्हेरिएंट हा ओमिक्रॉन बीए 2.86 या व्हेरिएंटचा एक स्ट्रेन आहे. त्याला पिरोला असेही म्हटले जाते. ऑगस्ट 2023 मध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा समोर आला होता. डिसेंबर 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने त्याला इंटरेस्ट व्हेरिएंट म्हणून घोषित केले. या व्हेरिएंटमध्ये जवळपास 30 म्युटेशन कार्यरत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, जेएन-1 इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो, परंतु तो फार गंभीर नाही. डोकेदुखी, ताप येणे, डोळ्यात जळजळ, कोरडा खोकला, चव जाणे आणि वास न येणे, घशामध्ये खवखव, सर्दी, थकवा येणे, मांसपेशींमध्ये वेदना, उलट्या होणे आदी याची लक्षणे आहेत. जेएन-1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे बरी झाल्यानंतरही कायम राहतात.
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…